Lonavala : लोकवर्गणीतून वरसोली गावात अंतर्गत रस्ते व भूमिगत गटारांची कामे

एमपीसी न्यूज- वरसोली गावातील अंतर्गत रस्ते, भुमीगत गटारे तसेच ठाकरवाडी येथील भूमिगत गटारे ही सुमारे 40 लाख रुपयांची विकासकामे लोकवर्गणी, ग्रामपंचायत निधी व 14 वा वित्त आयोग निधीतून सुरु करण्यात आली आहे. सरपंच सारिका संजय खांडेभरड यांच्या हस्ते या कामांना वरसोली गावात सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपसरपंच दत्ता खांडेभरड, ग्रामपंचायत सदस्य अरुणा खांडेभरड, बबन खरात, अरविंद बालगुडे, रजनी कुटे, माजी उपसरपंच संजय खांडेभरड, ज्येष्ठ नागरिक राजाराम कुटे, बाळू शेलार, लक्ष्मण शेलार, अशोक ढाकोळ, विलास खांडेभरड, अनिल खांडेभरड, श्यामराव येवले, शिवाजी खांडेभरड, नारायण कुटे, सोमनाथ शेलार, प्रवीण येवले, राजु कुटे, ग्रामसेवक आनंद होळकर, रवींद्र इथापे, महेंद्र एरंडे, काॅन्ट्रक्टर कुश खन्ना हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.