Lonavala : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकाला घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala ) वरसोली कचरा डेपो शेजारील गॅस गोडाऊन समोर एका युवकाला गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले आहे. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गुप्त बातमीदारा मार्फत ही माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावत ही कारवाई करण्यात आली.

अविनाश उर्फ अवी कैलाश आंबेकर (वय 26, रा. देवले, ता. मावळ) असे या युवकाचे नाव आहे. याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ म्हणाले, 26 डिसेंबर रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, एक इसम विना परवाना गावठी पिस्टल जवळून बाळगून फिरत आहे. तो आज वरसोली कचरा डेपो येथील भारत गॅसच्या गोडाऊन जवळ येणार आहे.

Pimpri : भर चौकात तरुणावर पालघन व कोयत्याने वार, पिंपरीतील धक्कादायक प्रकार

धुमाळ यांच्या टीम मधील पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले व कर्मचारी हे गॅस गोडाऊन जवळ गेले असता सदर इसम हा त्यांना पाहून पळून जात असताना पथकाने त्याला पाठलाग करत पकडले. अंग झडती घेतली असता त्याच्याकडे (Lonavala ) गावठी बनावटीचे एक पिस्टल व एक जीवंत राऊंड असा 35 हजार 500 रुपयांचा माल मिळून आला आहे. त्याच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व किशोर धुमाळ वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार विजयकुमार मुंढे, पोलीस हवालदार नितीन कदम, पोलीस हवालदार संतोष शेळके, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस नाईक भूषण कदम, पोलीस नाईक किशोर पवार, पोलीस अंमलदार संजय पंडीत, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे, पोलीस अंमलदार ऋषीकेश पंचरास यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.