Lonavala : पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेच्या प्रवक्तेपदी सुभाष भानुसघरे

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेच्या प्रवक्तेपदी शिलाटणे येथील हभप सुभाष महाराज भानुसघरे गुरुजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वारकरी साहित्य परिषेदेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक-अध्यक्ष विठ्ठल महाराज पाटील (काकाजी) यांच्या उपस्थितीत आळंदी येथील कोलदेर धर्म शाळेत पार पडलेल्या बैठकीत पुणे जिल्हा अध्यक्ष हभप अशोक महाराज काळे यांनी सुभाष भानुसघरे यांची प्रवक्तेपदी निवड केली.

  • यावेळी राज्य सचिव नरहरी महाराज चौधरी, हभप चैतन्य कबीर, हभप मंगला कांबळे, अनुराधा शेडगे, अंनत महाराज तांबे, भाऊसाहेब कर्डिले, उमेश महाराज शिंदे, रामदास कुटे, नाना बिरदवडे, अनंतराव गटकळ, सर्जेराव गाढवे, प्रकाशमहाराज बो-हाडे, संजय धुंडरे यांच्यासह प्रवचनकार व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

सुभाष भानुसघरे हे देवघर येथील प्राथमिक शाळेत शिक्षक असून मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तथा मावळ तालुका निवेदक संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहतात. त्यांची जिल्हा वारकरी साहित्य परिषदेच्या प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल मावळ तालुका वारकरी संप्रादयातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.