LPG cylinder : व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ

एमपीसी न्यूज – एलपीजी सिलेंडरच्या ( LPG cylinder) किंमतीत पुन्हा वाढ झाली असून या  गॅस दरवाढीचा मोठा फटका  व्यावसायिकांना  बसला आहे.घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) शुक्रवार, 1 डिसेंबर रोजी व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमती प्रति सिलेंडर 21 रुपयांनी वाढ केली आहे.

Vadgaon : कर्तृत्ववान लोकांनाच नेतृत्व करण्याचा अधिकार – भागवताचार्य गुलाबराव महाराज खालकर

या वाढीनंतर, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किरकोळ विक्री किंमत 1,796.5 रुपये झाली आहे. तर मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमत 1,749 रुपये, चेन्नईमध्ये 1,968.5 रुपये आणि कोलकातामध्ये 1,908 रुपयांपर्यंत ( LPG cylinder) होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.