Vadgaon : कर्तृत्ववान लोकांनाच नेतृत्व करण्याचा अधिकार – भागवताचार्य गुलाबराव महाराज खालकर

एमपीसी न्यूज – जीवाला मातृत्व कळावं लागतं, पितृत्व कळावं लागतं; तरच कर्तृत्व ( Vadgaon) कळतं. कर्तृत्व कळलं तरच त्याला नेतृत्व करण्याचा अधिकार प्राप्त होतो.दिगंबर भेगडे हे मातृ- पितृभक्तच होते. त्यांना आपल्या कर्तृत्वाची जाण होती. त्यामुळेच त्यांचे नेतृत्व समाजमान्य झाले, असे प्रतिपादन भागवताचार्य गुलाबराव महाराज खालकर यांनी केले.

माजी आमदार स्वर्गीय दिगंबर भेगडे यांच्या बाराव्या मासिक श्राद्धानिमित्त वडगावमध्ये भागवताचार्य गुलाबराव महाराज खालकर यांची कीर्तनरूपी सेवा झाली. हा कार्यक्रम पोटोबा महाराज मंदिर प्रांगण या ठिकाणी मंगळवारी (दि. 28) सकाळी दहा ते बारा या वेळेत पार पडला. पवित्र सोंवळीं। एक तीच भूमंडळी || ज्यांचा आवडता देव। अखंडित प्रेमभाव।। तींच भाग्यवंतें। सरतीं पुरतीं धनवित्तें || तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ।।  हा अभंग हभप खालकर महाराज यांनी कीर्तनसेवेसाठी निवडला.

या प्रसंगी संत तुकाराम साखर कारखान्याचे मा संचालक माऊली शिंदे,शिवाजीराव टाकवे,मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर,भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे,मा सभापती राजाराम शिंदे,गुलाबराव म्हाळसकर,राष्ट्रवादीचे नेते नारायण ठाकर,अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळचे अध्यक्ष शांताराम बोडके,हभप सुखदेव महाराज ठाकर,बंडोपंत भेगडे,मा उपसभापती शांताराम कदम, पवना कृषकचे अध्यक्ष विठ्ठल घारे,राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष कैलास गायकवाड,पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त तुकाराम ढोरे, यदुनाथ चोरघे,सोमनाथ काळे अदिजन उपस्थित होते.

Today’s Horoscope 01 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

कीर्तनाचे निरूपण करताना खालकर महाराजांनी सांगितले की, खरे भाग्यवंत कोण, याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात- “ज्यांच्या चित्तात देवाविषयी अखंड प्रेमभाव आहे व ज्यांना फक्त देवच आवडतो, तेच जगात पवित्र व सोवळे आहेत. तेच भाग्यवान व तेच श्रीमंत, त्यांनी जी सेवा केली आहे, ती सर्व देवाला पोहोचते व अशा भक्तांची जर आपण सेवा केली, तर ती देवाला पोहोचते.” असे स्पष्ट करत श्रावण बाळाची मातृ-पितृ भक्ती, रामायण- महाभारतातील तसेच भागवत पुराणातील अनेक दाखले महाराजांनी यावेळी दिले.

मातृ पितृ भक्ती असणारी व्यक्ती ही परमेश्वरी भक्ती असतेच, पण अशीच व्यक्ती समाजाला देव मानूनच आपला सेवाभाव शेवटपर्यंत निभावित असते. अशाच व्यक्तीचे अर्थात स्वर्गीय दिगंबर दादा भेगडे यांचे स्थान समाजाच्या ह्रदयात कायम राहते. ते राजकारणात ही होते परंतु त्यांनी परमार्थाचे वलय शेवटपर्यंत अंगिकारले.

त्यामुळेच मावळ तालुक्याच्या समाजमनात आज त्यांचा वेगळा ठसा आहे. पारमार्थिक वलय होते. तेच संस्कार त्यांनी समाजाला देऊन समाजासाठी काम करीत राहिले. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्याचा शुद्ध भाव झाला त्याला देव दूर नाही आणि ती व्यक्तीही देवापासून दूर नाही अथवा दूर  जात नाही असेही खालकर महाराजांनी सांगितले.

तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांनी उपस्थित सर्वांच्या वतीने आदरांजली  वाहिली व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी आलेल्या सर्वांचे परिवाराच्या वतीने ऋणनिर्देश व्यक्त करून दिगंबर दादांच्या आठवणींना  उजाळा दिला.

कार्यक्रमाचे नियोजन श्री पोटोबा देवस्थान,अखिल भारतीय वारकरी मंडळाचे वतीने करण्यात आले होते. अध्यक्ष नारायण ढोरे,देवस्थान विश्वस्त सचिव, वडगाव भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे,कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे,मा उप नगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, नगरसेवक प्रविण चव्हाण,दिनेश ढोरे,ॲड विजय जाधव,प्रसाद पिंगळे, रविंद्र म्हाळसकर,भुषण मुथा,मा सरपंच नितीन कुडे, उपसरपंच सुधाकर ढोरे,युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे,सरचिटणीस कल्पेश भोंडवे,मकरंद बवरे,सागर म्हाळसकर,  शरद मोरे, हरिष दानवे आदिंनी ( Vadgaon)  केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.