Today’s Horoscope 01 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 01 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख – 01.12.2023.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस. 

आज विशेष – सामान्य दिवस

राहू काळ – सकाळी 20.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – पुनर्वसु 16.40 पर्यंत नंतर पुष्य.

चंद्र राशी – मिथुन 10.12  पर्यंत नंतर कर्क.

—————————–

मेष – ( शुभ रंग – राखाडी)

धंद्यातील येणे वसूल होईल. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगलीच जमेल. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व तुम्ही सिद्ध करू शकाल.

वृषभ – ( शुभ रंग- मोरपिशी)

आज तुमचे मन थोडे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात काही नव्हे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा राहील.

मिथुन – ( शुभ रंग- चंदेरी)

आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे हिताचे राहील. किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. सामंजस्याने प्रश्न सुटतील.

कर्क – ( शुभ रंग – डाळिंबी)

आज तुमची तब्येत थोडी नरम असेल. किरकोळ गोष्ट फार मनाला लावून घ्याल. मोफत सल्लागार मंडळींनी दिलेले सल्ले ऐकून घ्यायला काही हरकत नाही.

सिंह – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात आज थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल.

कन्या – ( शुभ रंग- भगवा)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या काही इच्छा पूर्ण होतील. वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

तूळ- ( शुभ रंग- सोनेरी)

 आज उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक तुमच्याशी आदबीने वागतील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल.

वृश्चिक-  ( शुभ रंग – गुलाबी)

महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.

धनु – (शुभ रंग- जांभळा)

विश्वासू माणसा कडूनही विश्वासघात होईल. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.

मकर-  (शुभ रंग- क्रीम)

काम कमी आणि दगदगच जास्त होईल. आज तुम्ही उगीचच इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज एखाद्या विवाह सोहळ्यास हजेरी लावाल. पत्नीच्या हो ला हो करून मोकाळे व्हा.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)

आज तुम्हाला मामा मावशी कडून काही महत्त्वाचे समाचार येतील. काही जुनी दुखणी पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. जोडीदाराबरोबर थोडे वैचारिक मतभेद संभवतात.

मीन – ( शुभ रंग- पिस्ता)

आज तुमच्यात चैनी व विलासी वृत्ती बडावेल. उंची वस्त्र खरेदी कराल शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील कलावंत आज मिळालेल्या संधीचे सोने करतील.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन-  9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.