Chinchwad : पंचकच्या प्रीमियर शोसाठी उद्या माधुरी दीक्षित पिंपरी चिंचवडमध्ये!

एमपीसी न्यूज – माधुरी दीक्षित यांनी निर्मित केलेला (Chinchwad) पंचक या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो शुक्रवारी (दि.5) सकाळी 10 वाजता चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल चिंचवड येथे आयोजित केला आहे. यानिमित्त धकधक गर्ल माधुरी दीक्षित पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच येत आहे.

‘आपला आवाज आपली सखी’च्या वतीने या प्रीमियर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या शोसाठी पंचक चित्रपटामधील सर्व कलाकार तसेच, संपूर्ण टीम उपस्थित राहणार आहेत.

Pune : ‘पीएमआरडीए’च्या प्रस्तावाला स्थगिती द्या; माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आता पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीलाही प्राधान्य दिले जात आहे. फस्ट डे फस्ट शो आता पिंपरी-चिंचवड शहरात होत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आपला चित्रपट (Chinchwad) रिलीज करण्यासाठी शहरात येत आहे, हे त्याचेच उदाहरण आहे. ही शहरवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.