Pune : ‘पीएमआरडीए’च्या प्रस्तावाला स्थगिती द्या; माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – ‘पीएमआरडीए’च्या प्रस्तावाला स्थगिती देण्याची (Pune) मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केली आहे.

‘पीएमआरडीए’ने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सुविधा क्षेत्र लिलावाचे देण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. याबाबत आमची मे. हायकोर्टात PIL प्रलंबित आहे. माण गावातील दोन भूखंड यांचे लिलाव शैक्षणिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असे जाहिरातीत नमूद आहे.

Maharashtra : नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय

सुविधा क्षेत्र वापरण्यास परवानगी आहे ते वापरण्यास परवानगी मिळाली पाहिजे. सुविधा क्षेत्र वापरण्याचा आराखडा बनवायला पाहिजे, विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर तसे न करता या ठिकाणी शैक्षणिक प्रयोजनासाठी असे नमूद केल्याने स्पर्धा होणार नाही, आणि कुठलीतरी विशिष्ट शैक्षणिक संस्था डोळ्यासमोर ठेवून या लिलावाचा उद्देश आहे असे वाटते.

मुळात “विकास आराखडा” अंतिम न होता असे लिलाव करणे, हे चुकीचे आहे. त्यामुळे या लिलावाला स्थगिती द्यावी, असे या माजी नगरसेवकांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.