Madurai Accident : मदुराईत ट्रेनला लागली आग, 9 प्रवाशांचा मृत्यू; 25 जखमी

एमपीसी न्यूज : तामिळनाडूतील मदुराईमध्ये एका ट्रेनच्या डब्याला (Madurai Accident) भीषण आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे घडल्याचं समोर आलं आहे. या आगीत ट्रेनचा डबा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या घटनेमध्ये आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. ही एक खासगी टूरिस्ट ट्रेन असल्याची माहितीही समोर आली आहे. यासंदर्भात रेल्वेकडून अधिक तपास केला जात आहे.

लखनौहून रामेश्वरमला निघालेल्या या ट्रेनच्या टूरिस्ट कोचमध्ये ही आग लागल्याची घटना घडली. मदुरई स्थानकाजवळ ही ट्रेन पोहोचल्यानंतर पहाटे सव्वा चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Kondhwa Crime : वाढदिवसाचा केक न स्वीकारणाऱ्या तरुणीवर घरात घुसून हल्ला; एकतर्फी प्रेमातून तरुणाचे कृत्य

मदुरई यार्ड जंक्शनजवळ ट्रेन थांबलेली असताना आग लागल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर (Madurai Accident) अखेर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

दरम्यान, आग लागलेल्या कोचमध्ये काही प्रवाशांनी गॅस सिलेंडर चोरून नेल्याचे सांगितलं जात आहे. या सिलेंडरमुळे आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून यासंदर्भात अधिक तपास केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.