Mahalunge : शिकाऊ कामगाराने केली कंपनीत साडेतीन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – शिकाऊ कामगाराने कंपनीतून साडेतीन लाखांचे (Mahalunge)पार्ट चोरून नेले. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी निघोजे येथील महिंद्र हेव्ही इंजिन्स लिमिटेड येथे उघडकीस आली.

निकेतन अशोक उगले (रा. आंबेठाण, ता. खेड. मूळ रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी स्टोअर मॅनेजर विकास मोहिते यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maharashtar : शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निकेतन (Mahalunge)हा महिंद्र हेव्ही इंजिन्स लिमिटेड या कंपनीत शिकाऊ कामगार आहे. त्याने 23 ऑक्टोबर पूर्वी कंपनीतून इंजिन तयार करण्यासाठी लागणारे लोखंडी इंजेक्टर पार्ट निकेतन याने चोरून नेले. निकेतन याने एकूण 43 किलो वजनाचे तीन लाख 58 हजार 560 रुपये किमतीचे 54 नग चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. स्टोअर मॅनेजरच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.