Maharashtra : अजित पवार होणार उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे ‘हे’ मंत्री घेणार शपथ

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra) पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट घडून आला आहे. राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासोबत 30 आमदारांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. तर, अजित पवार लवकरच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.  तर नऊ नेते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे, आदीती तटकरे आणि धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे. 

शिवसेनेचे शिंदे गटातील सर्व नेते राजभवनात दाखल झाले आहेत. लवकरच सर्वांचा शपथविधी होणार आहे. पुढील मंत्री घेणार शपथ –

  1. अजित पवार (उपमुख्यमंत्री)

2. छगन भुजबळ

3. अदिती तटकरे

4. नरहरी झिरवळ

5. दिलीप वळसे पाटील

6. संजय बनसोडे

7. हसन मुश्रीफ

8. अनिल भाईदास पाटील

9. धनंजय मुंडे

 

या प्रसंगी दिलीप मोहिते पाटील, अमोल कोल्हे, अमोल मिटकरी तर अजित पवार यांच्या पत्नी उपस्थित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.