Maharashtra Budget 2021: नवीन घराची नोंदणी महिलेच्या नावाने केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत

मोशीत आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्य सरकारचा सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. राजमाता जिजाऊ गृह स्वामिनी योजना त्यांनी जाहीर केली आहे. 1 एप्रिल 2021 पासून नवीन घर घेताना घराची नोंदणी महिलेच्या नावाने केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच मोशी येथे आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.

स्त्री नसते केवळ वस्तू ती असते नवनिर्मितीची गाथा जिथे आपण सर्वांनी टेकवावा माथा, असे म्हणत अजित पवार यांनी राजमाता जिजाऊ गृह स्वामिनी योजना जाहीर केली. नवीन घर विकत घेताना गृहिणीच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत दिली जाणार आहे. घर महिलेचा नावावर असले पाहिजे.

अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये
#क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीबसचा मोफत प्रवास
# मोशी येथे आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार
#पुण्यात साखर उद्योगाच्या बदलांचा आढावा घेणारे साखर संग्रहालय उभारणार
# ठाणे आणि पुण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प
#पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे काम झपाट्याने होणार, 235 किमी लांबीचा मार्ग , 16039 कोटींचा खर्च
# औंध येथे रुग्णालय, राज्यात आठ मध्यवर्ती ठिकाणी कार्डियाक लॅब
#150 रुग्णालयात कर्करोग निदानासाठी सुविधा देणार
#एसटी बस आगारांचा विकास , 1400 कोटींची तरतूद
#हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटींच्या खर्चाला मान्यता
# राज्य राखीव पोलीस दलात पहिलीच महिला पोलीसांची तुकडीची घोषणा
# अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 100 कोटी अतिरिक्त भाग भांडवल
# आरोग्य क्षेत्रासाठी 7500 कोटींची घोषणा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.