Maharashtra Bus Accident : महाराष्ट्राची बस कोसळली नर्मदा नदीत; 13 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मध्यप्रदेशमधील धार येथे महाराष्ट्राच्या (Maharashtra Bus Accident) दिशेने येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील पाच जणांची ओळख पटली असून त्यातील दोघेजण महाराष्ट्राचे आहेत. तर एकूण 55 प्रवासी प्रवास करत होते. त्यातील 15 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आज सकाळी इंदोरहुन अमळनेरला निघालेल्या या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. आणि हि बस प्रवाशांसह पुलाचे रेलिंग तोडून नर्मदा नदीत कोसळली. या बसाचा अपघात इतका भीषण होता, कि बस पूर्णपणे चकाचूर झाली आहे. तर, तेरा प्रवासी चालक आणि वाहक सकट मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांमध्ये बहुतांश महाराष्ट्रातील लोक असल्याचे म्हंटले जात आहे. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आली आहे. धार, खरगोन आणि इंदूर जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.

Crime News : गाड्यांची तोडफोड व लुटमार करणारी तीन अल्पवयीन मुले ताब्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Maharashtra Bus Accident) जखमींना योग्य ती वैद्यकीय मदत देणे, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणे असे आदेश जळगाव जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे जळगाव प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांकही सुरू केला आहे. मृतांमध्ये बहुतांश महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व मृतदेह सन्मानाने महाराष्ट्रात पाठवले जातील असे सांगितले आहे. नर्मदा नदीत अनेकांचा शोध सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.