Maharashtra Corona Update : आज नव्या रुग्णापेक्षा डिस्चार्ज दुप्पट, राज्यात 16,905 ॲक्टिव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शनिवारी) नव्या कोरोना रुग्णांपेक्षा डिस्चार्जची संख्या दुप्पट आहे. आज दिवसभरात 1 हजार 130 नवे रुग्ण वाढले असून 2 हजार 148 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 16 हजार 905 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत‌.

आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 09 हजार 906 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 49 हजार 186 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.57 टक्के झाला आहे.

 

राज्यात आज 26 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवर 1 लाख 40 हजार 196 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 6 कोटी 25 लाख 59 हजार 171 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 897 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर 1 लाख 67 हजार 064 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.