Maharashtra Corona Update : आज 460 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 718 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 460 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 710 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, आजवर 78 लाख 69 हजार 498 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 77 लाख 18 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.08 टक्के आहे. राज्यात सध्याच्या घडीला 3,209 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

राज्यात आज 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 43 हजार 745 जण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. सध्या 25,557 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 605 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत 7 कोटी 83 लाख 67 हजार 636 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

एमपीसी न्यूज पाॅडकास्ट | पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा | पाॅडकास्ट ऐकण्यासाठी ही लिंक क्लिक करा….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.