Maharashtra Corona Update: कोरोनाचे 2,250 नवीन रुग्ण; 10,318 कोरोनामुक्त तर 26 हजार 581 सक्रिय रुग्ण

Maharashtra Corona Update: 2,250 new corona patients; 10,318 corona free while 26 thousand 581 active patients

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 39 हजार 297 झाली आहे. आज 2250 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६७९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 10 हजार 318 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 26 हजार 581 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 07 हजार 72 नमुन्यांपैकी 2 लाख 67 हजार 775 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 39 हजार 297 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 04 हजार 692 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 26 हजार 725 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 65 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1390 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 41, पुण्यात 13, नवी मुंबईमध्ये 3, पिंपरी- चिंचवड -2, सोलापूरात 2, उल्हासनगरमध्ये 2, तर औरंगाबाद शहरात 2 मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 46 पुरुष तर 19 महिला आहेत. आज झालेल्या 65 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 32 रुग्ण आहेत तर 31 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 2 जण 40 वर्षांखालील आहे. या 65 रुग्णांपैकी 48 जणांमध्ये (74 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील:(कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 24,118 (841)
ठाणे मंडळ एकूण: 30,025 (650)
नाशिक मंडळ एकूण: 1344 (85)
पुणे मंडळ एकूण: 5152 (255)
कोल्हापूर मंडळ एकूण: 322 (5)
औरंगाबाद मंडळ एकूण: 1236 (37)
लातूर मंडळ एकूण: 146 (6)
अकोला मंडळ एकूण:577 (34)
नागपूर मंडळ एकूण: 447 (7)
इतर राज्ये: 48 (11)
एकूण: 39 हजार 297 (1390)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1849 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 15 हजार 495 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 65.11 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.