Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,700 जणांना डिस्चार्ज; रिकव्हरी रेट 95.66 टक्के

एमपीसी न्यूज – राज्यात आज बरे झालेल्या 2 हजार 700 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 19 लाख 81 हजार 408 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 95.66 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आज देखील तीन हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दिवसभरात राज्यात 3 हजार 663 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली.

यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 71 हजार 306 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या राज्यात 37 हजार 125 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात राज्यात 39 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 51 हजार 591 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे. आतापर्यंत केलेल्या 1 कोटी 53 लाख 96 हजार 444 नमूने तपासण्यात आले असून त्यापैकी 20 लाख 71 हजार 306 नमूने सकारात्मक आले आहेत.

राज्यात सध्या 1 लाख 82 हजार 970 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1 हजार 726 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात दररोज वाढ होणा-या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

स्थानिक जिल्हाधिकारी, आयुक्तांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या स्तरावर करोना नियंत्रित करण्यासाठी ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे त्या त्यांनी कराव्यात अशी सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत तिथे या उपाययोजना केल्या जातील. मात्र लॉकडाउन हा सर्वात शेवटचा पर्याय असेल. याचा अर्थ आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. गरज लागेल त्याप्रमाणे काळजी घेतली जाईल, असं राजेश टोपे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.