Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,286 नवे कोरोना रुग्ण, 3,933 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शुक्रवारी) 3 हजार 286 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 3 हजार 933 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्या 38 हजार 491 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 37 हजार 843 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 57 हजार 012 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.23 टक्के एवढे झाले आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 3,286
*⃣Recoveries – 3,933
*⃣Deaths – 51
*⃣Active Cases – 38,491
*⃣Total Cases till date – 65,37,843
*⃣Total Recoveries till date – 63,57,012
*⃣Total Deaths till date – 1,38,776
*⃣Tests till date – 5,78,19,385(1/4)🧵
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) September 24, 2021
राज्यात आज 51 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 1 लाख 38 हजार 776 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत 5 कोटी 78 लाख 19 हजार 385 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 58 हजार 653 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 462 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.