Maharashtra Corona Update : राज्यात आज 854 नवे कोरोना रुग्ण, 804 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शनिवारी) दिवसभरात 854 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 804 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 6 हजार 942 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 48 हजार 694 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 96 हजार 733 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.71 टक्के एवढा झाला आहे.

 

राज्यात आज 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजवर राज्यात 1 लाख 41 हजार 340 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. सध्याच्या घडीला राज्यात 80 हजार 039 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 886 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत 6 कोटी 75 लाख 70 हजार 939 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.