Maharashtra Corona Update : राज्यात आज 973 कोरोना रुग्णांची नोंद, 62 ओमायक्रॉन बाधित

एमपीसी न्यूज – राज्यात आज (शुक्रवारी) दिवसभरात 973 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 521 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 62 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  
राज्यात आतापर्यंत 77 लाख 7 हजार 254 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.01 टक्के आहे. राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे.

सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 800 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 746 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 76 लाख 58 हजार 977 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
ओमायक्रॉन अपडेट

राज्यात आतापर्यंत 4 हजार 629 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4 हजार 456 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 173 ओमायक्रॉनचे रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.