Maharashtra Corona Update : राज्यात आज पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण, 216 मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात पाच हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज (बुधवारी) 5 हजार 031 नवे रुग्ण सापडले. तर, 216 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा 50 हजारांवर पोचली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 लाख 37 हजार 680 एवढी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 47 हजार 414 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज 4 हजार 380 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

महाराष्ट्रात सध्या 50 हजार 183 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 216 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजवर 1 लाख 36 हजार 571 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 97.04 टक्क्यांवर पोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 5 कोटी 28 लाख 40 हजार 805 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 98 हजार 264 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 369 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.