Maharashtra Corona Update : 59 लाख रुग्ण कोरोनामुक्त; आज 10,458 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शुक्रवारी) दिवसभरात 10 हजार 458 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 59 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.08 एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 8 हजार 992 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 लाख 40 हजार 968 एवढी झाली आहे. सध्या राज्यात 1 लाख 12 हजार 231 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात आज 200 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 25 हजार 034 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.03 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 35 लाख 65 हजार 119 नमूने तपासण्यात आले आहेत.

सध्या राज्यात 6 लाख 27 हजार 243 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 756 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.