Maharashtra : राम मंदिराच्या अन्य भानगडीत पडू नका – राज ठाकरे

एमपीसी न्यूज – राम मंदिराच्या अन्य भानगडीत पडू नका, असे आवाहन (Maharashtra) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. राम मंदिराच्या शिलान्यासा निमित्ताने राज्यभरात कारसेवकांसाठी आरत्यांसह चांगले उपक्रम राबवा, असेही त्यांनी सांगितले.

मंदिर होण्यासाठी ज्या कारसेवकांनी कष्ट घेतले. स्वप्न पाहिले. ते स्वप्न 22 जानेवारीला पूर्ण होत आहे. त्या कारसेवकांसाठी महाराष्ट्रभर आरत्यांसह जे जे चांगले उपक्रम राबवता येतील ते राबवा, असे आवाहन राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. राम मंदिराच्या शिलान्यासासंदर्भात कोणतेही चांगले उपक्रम राबविताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही राज यांनी कार्यकर्त्यांना केल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हाध्यक्षांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी राज बोलत होते. व्यासपीठावर बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, नितीन सरदेसाई, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राजू उंबरकर आदी उपस्थित होते.

Pune : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचा ‘जय श्रीराम’चा नारा

राज ठाकरे म्हणाले, तुम्ही हुशार, प्रामाणिक आहात. लोकांचे प्रश्न (Maharashtra) सोडविण्यासाठी तुम्ही उत्सुक, इच्छुक आहात. तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. फक्त गाव स्वच्छ ठेवा, एवढेच मला सांगायचे आहे. आपल्या आजूनबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे लागत नाही. इच्छाशक्ती लागते. जेवढे तुम्ही गाव, परिसर स्वच्छ ठेवाल तेवढे तुम्ही रोगराईमुक्त व्हाल. गावामध्ये छान वाटले पाहिजे. अस्वच्छ वातावरणामुळे तुमचे मनही अस्वच्छ होते. तुम्हाला असेच अस्वच्छ राहते. तुम्हाला जगण्याची उर्मी ही कमी होते,’ असे सांगत राज यांनी पदाधिकाऱ्यांना गावे स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, राज ठाकरे यांना बरे वाटत नसल्याने त्यांनी काही मिनिटेच उपस्थित पद्धधिकाऱ्यांशी संवाद साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.