Maharashtra : राज ठाकरेंच्या आव्हानाची तात्काळ दखल; माहीम खाडीतील दर्ग्याचे बांधकाम हटवले

एमपीसी न्यूज : मनसे नेते राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत बांधकाम (Maharashtra) आणि अचानक निर्माण केलेल्या दर्ग्याविरोधात आवाज उठवला असता आज लगेचच तात्काळ दखल घेत महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काल केलेल्या भाषणाने सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडव्याच्या संध्याकाळी जाहीर सभेत मुंबईतील माहीम दर्ग्याच्या मागे समुद्रात बांधलेल्या मजारबाबत शिंदे सरकारला घेरले. ते म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी येथे काहीही नव्हते, मी स्वत: सॅटेलाइटद्वारे तपासले आहे. पण आज येथे एक दर्गा दिसतो. आजूबाजूच्या समुद्रात बेकायदा बांधकामे दिसून येत आहेत.

महाराष्ट्राचे शिंदे सरकार, मुंबई पोलिस आयुक्त आणि बीएमसी काय करत आहेत? असा सवाल त्यांनी केला होता. जर हे अनधिकृत बांधकाम महिनाभरात पाडले नाही, तर या समाधीशेजारी गणपतीचे सर्वात मोठे मंदिर बांधेन, असा इशारा त्यांनी दिला असताना आज सरकारने तात्काळ दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे.

राज ठाकरेंच्या या इशाऱ्याचा परिणाम असा झाला की, घाईगडबडीत या समाधीबाबत रात्री बैठक (Maharashtra) झाली. पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या या बैठकीत बेकायदा बांधकाम पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यरात्रीपासूनच मुंबई पोलिसांनी या दर्ग्याजवळ चोख बंदोबस्त ठेवला होता. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत शांतता भंग होणार नाही.

अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने हे अवैध बांधकाम पाडण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुंबई जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने राज ठाकरेंचा इशारा गांभीर्याने घेतला आहे. सहसा अशा कृतीसाठी थोडा वेळ लागतो.
राज ठाकरे यांनी जाहीर सभेत या दर्ग्याचा व्हिडिओही जनतेला दाखवला.

Wakad News: सामाजिक आणि आर्थिक विकासात स्टार्टअप्सची भूमिका महत्त्वाची – आयुक्त शेखर सिंह

ते म्हणाले, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काहीतरी समजते. हे सर्व गेल्या दोन-अडीच वर्षांत घडले आहे. पण आमचे लक्ष दुसरीकडे आहे. आपण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या लढाईत अडकलो आहोत. जिथे हे बेकायदेशीर बांधकाम झाले आहे तिथे मुंबईचे माहीम पोलीस ठाणे आहेत. पण आजूबाजूला काय चालले आहे याची त्यांना कल्पना नाही. तुम्हाला हे योग्य वाटते का? असा सवालही त्यांनी मुस्लिम समाजाला केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.