Maharashtra : आता उद्धव ठाकरेंनी आम्हाला नैतिकता शिकऊ नये – एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra) यांच्या बाजूने  निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पहिली प्रतिक्रीया पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर सडकून टिका केली. यावेळी न्यायालयाच्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत. मेरीटवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून उद्धव ठाकरेंनी आम्हाला नैतिकता शिकऊ नये, असा टोला शिंदे यांनी लगावला आहे.

शिंदे पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला चपराक लगावली आहे. उद्धव ठाकरे आम्हाला नैतिकता शिकवतात. राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत मिळून सरकार स्थापन केले तेव्हा यांची नैतिकता कुठे होती. त्यामुळे नैतिकतेवर बोलायचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही.

Maharashtra News : वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

आम्ही कायद्याचा चौकटीत राहून सरकार स्थापन केले आहे. हे घटनाबाह्य सरकार नाही. शिवसेना आमची आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे त्यामुुुळे व्हीप देखील आमचाच असेल, असे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निकालाबद्दल आम्ही समाधानी (Maharashtra) आहोत. हा लोकशाहीचा, लोकमताचा विजय आहे. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत हे स्पष्ट आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत त्यामुळे आमदारांचे सर्व अधिकार त्यांना आहेत.

तसेच निवडणूक आयोगाला देखील निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असेही फडणवीस यांनी परिषदेत सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.