Maharshtra News : प्रशिक्षणार्थी विमान बालाघाट जिल्ह्यातील जंगलात कोसळले, दोन पायलट ठार

एमपीसी न्यूज -बालाघाटच्या नक्षलग्रस्त भागात प्रशिक्षणार्थी (Maharshtra News) विमान कोसळले. या अपघातात महिला वैमानिक आणि प्रशिक्षकाांना आपला जीव गमवावा लागला. वैमानिकाचे नाव रुखशंका आणि प्रशिक्षकाचे नाव मोहित आहे. गोंदिया एटीसीचे एजीएम कमलेश मेश्राम यांनी अपघाताला दुजोरा दिला आहे.

 

महाराष्ट्रातील बिरसी येथे वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. तेथून प्रशिक्षणार्थी विमानाने दुपारी दोन वाजता उड्डाण केले होते. अडीच तासांनंतर दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्याचा शेवटचा ठावठिकाणा सापडला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती जळताना दिसत आहे.

 

 

Today’s Horoscope 19 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

किरणपूरजवळील भाक्कू टोला येथील जंगलात ही घटना घडली. हे जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 40 किमी अंतरावर आहे. बालाघाटचे पोलिस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितले की, ट्रेनर आणि एक महिला ट्रेनी पायलट विमानात होते. विमानाच्या ढिगाऱ्यात एका व्यक्तीचा मृतदेह जळताना दिसत आहे.

 

दुसऱ्याची वैमानिकाची माहिती मिळू शकली नाही. हे प्रशिक्षणार्थी विमान महाराष्ट्रातील (Maharshtra News) गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळाचे प्रशिक्षणार्थी विमान होते. बालाघाट जिल्ह्याच्या सीमेवर ते कोसळले आहे. अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही. डोंगराळ आणि दुर्गम भाग असलेल्या किरनापूरच्या कोस्मारा पंचायतीअंतर्गत भाक्कू टोला गावात ही घटना घडली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.