Today’s Horoscope 19 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 19 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग –
वार – रविवार.
19.03.2023.
शुभाशुभ विचार- क्षयदीन.
आज विशेष- प्रदोष.
राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र- धनिष्ठा 22.44 पर्यंत नंतर शततारका.
चंद्र राशी – मकर 11.07 पर्यंत नंतर कुंभ.
मेष – ( शुभ रंग- पांढरा )
आज तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या काही इच्छा पूर्ण होतील वाहन वास्तु खरेदीतील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व कराल.
वृषभ (शुभ रंग- जांभळा )
उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक तुमच्याशी नम्रतेने वागतील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यासच प्राधान्य द्याल.
मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )
आज घरात थोरमंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आज थोडी भटकंती होईल. ज्येष्ठ मंडळी तीर्थाटनाचे बेत आखतील.
कर्क (शुभ रंग- गुलाबी.)
महत्त्वाची कामे असतील ती दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. दुपारनंतर कार्यक्षेत्रात थोडे प्रतिकूल वातावरण असेल. गृहिणींना वडीलधाऱ्यांची मने सांभाळावी लागतील.
सिंह (शुभ रंग- मरून )
महत्त्वाची सर्व कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या दुपारनंतर दिवस तितकासा अनुकूल नाही. नवीन ओळखीत फक्त रामराम करा. कोणताही आर्थिक व्यवहार नको.
कन्या ( शुभ रंग- डाळिंबी)
धंद्यातील रखडलेली येणी वसूल होतील. विरोधकांशीही गोड बोलून आपला स्वार्थ साधण्याकडे आज तुमचा कल असेल. वैवाहिक जीवनात दुपारनंतर सुसंवाद महत्त्वाचा राहील. जोडीदाराच्या चुका काढू नका.
तूळ ( शुभ रंग- निळा)
आज तुमच्यात चैनी व विलासी वृत्ती वाढेल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय आज चांगले चालतील. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.
वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. प्रेमीगुलांमध्ये वादविवाद संभवतात.
धनु- (शुभ रंग- आकाशी)
काम कमी व दगदगच जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकावे लागेल. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. कुणालाही सल्ले देण्याचा प्रयत्न करू नका. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल.
मकर ( शुभ रंग- लाल )
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात वादविवाद संभवतात. अति हुशार मंडळींच्या फार नादी लागू नका.
कुंभ (शुभ रंग – केशरी )
आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. महत्त्वाच्या चर्चेत इतरांची ही मते ऐकून घेणे हिताचे राहील. विरोधकांशी गोड बोलूनच स्वार्थ साधून घ्यावा लागेल.
मीन -(शुभ रंग – मोतिया )
आज तुमची तब्येत थोडीशी नरमच असेल. क्षुल्लक गोष्टी फार मनाला लावून घ्याल. आज जशास तसे या धोरणाने वागा मोफत सल्लागार मंडळींचे सल्ले फार मनावर घेऊ नका.