Mahesh Landge : आईचा अर्धाकृती पुतळा बनवून यंदाचा ‘इंद्रायणी थडी’ उत्सव जगभरातील सर्व आईंना केला समर्पित

एमपीसी न्यूज : भोसरीमध्ये 25 जानेवारीपासून (Mahesh Landge) इंद्रायणी थडी उत्सवाला सुरुवात होत आहे. या उत्सवाच्या प्रारंभीच आमदार महेश लांडगे यांनी आईच्या जयंती दिनी आईची स्मृती जागवत त्यांच्या आईच्या अर्धाकृती पुतळ्याची निर्मिती केली आहे. या निमित्ताने त्यांनी आई आणि इंद्रायणी थडीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी यंदाचा इंद्रायणी थडी उत्सव हा जगातील सर्व आईना समर्पित केला आहे.

इंद्रायणी थडीचा उत्सव दोन दिवसावर आला असताना आमदार महेश लांडगे यांनी आज आईच्या वाढदिवसानिमित्त आईच्या अर्धाकृती पुतळयाची निर्मिती केली आहे. हा पुतळा इंद्रायणी थडी 2023 च्या महोत्सवात बसवण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला आहे.

आईच्या आठवणींचा व्हिडिओ शेयर करत त्यांनी म्हंटले आहे, की ”इंद्रायणी थडी… माझ्या आईच्या जिव्हाळ्याचा महोत्सव. ग्रामसंस्कृती, खाद्य संस्कृती आवडीने पहायला येणारी आई आता (Mahesh Landge) कधीच हा महोत्सव बघायला येणार नाही.

Pimpri News :  नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

ही कल्पनाच मनात काहुर भरणारी आहे. यंदाचा महोत्सव हा जगभरातील सर्व तिर्थरुप आईंना समर्पित आहे. ‘‘मातृ देवो भव:’’ हा विचार लोकांपर्यंत पोहोचावा आणि माझ्या आईचे स्मरण व्हावे. या करिता संयोजकांनी आईचा अर्धाकृती पुतळा ‘‘इंद्रायणी थडी 2023’’ महोत्सवात बसवण्याचा निर्णय घेतला. आईची छबी हुबेहूब साकारणाऱ्या कलावंतालाही त्यांनी धन्यवाद म्हंटले आहे.

आमदार महेश लांडगे यांना 23 सप्टेंबर रोजी मातृशोक झाला. त्यामुळे या वर्षीपासून त्यांची आई उत्सवात नसल्याने त्यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.