Pimpri : मला लोकसभेची उमेदवारी देत नसाल तर आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी द्या – विलास लांडे

एमपीसी न्यूज – भोसरीत मी आणि महेश लांडगे एकत्र आलो तर(Pimpri )कुठेही अडचण येणार नाही. आम्ही एकतर्फी निवडणूक काढू,  मला शिरूर लोकसभेची उमेदवारी देत नसाल तर आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी द्यावी असे माझे स्पष्ट मत आहे.

 

त्यांचे काम करायला मी तयार आहे. हे माझे प्रामाणिक मत असल्याचे सांगत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी अप्रत्यक्षपणे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.

Nigdi : रानजाई महोत्सवामुळे पर्यावरण विषयीचे महत्व वाढेल- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून ते शिरूर मधून निवडणूक लढवतील असे बोलले जात आहे. त्यावर लांडे म्हणाले की, त्यांचे स्वागत आहे. पण, आम्ही काही कमी नाहीत.

 

आम्हाला थांबण्यास काय सांगणार, ते का (Pimpri )याचे कारण सुद्धा समजले पाहिजे.  मी लोकसभा लढविली आहे. चारवेळा विधानसभा निवडणूक लढविली आहे. महापौर होतो. त्यामुळे निवडणुकीचा मला अनुभव आहे. नवखा नाही.

2019 मी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती.पण, ऐनवेळी थांबावे लागले.

यावेळी मी 100 टक्के निवडून येईल याची मला खात्री आहे. मी गेली 35 वर्ष राजकारणात आहे. मला मतदारसंघाची माहिती आहे. नातीगोती आहेत.भोसरीत साडेपाच लाख मतदार आहे. संपूर्ण शिरूरमध्ये नातीगोती आहेत. त्यामुळे काही अडचण नाही. निष्ठेला सुद्धा महत्व आहे. आमचा प्रामाणिकपणा अजित पवार यांच्यासोबत आहे, असेही लांडे म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.