Dapodi Crime News : पत्नीशी किरकोळ वाद झाल्यानंतर घरातून पुरूष बेपत्ता

एमपीसी न्यूज – पत्नीशी किरकोळ वाद झाल्यानंतर घरातून 38 वर्षीय पुरूष बेपत्ता झाला आहे. काटे वृंदावन, पिंपळे गुरव रोड, मोरया हॉस्पिटल पाठीमागे, दापोडी येथे सोमवारी (दि.29) रात्री 10.15 वा. ही घटना घडली. चार दिवस उटलून गेल्यानंतर देखील अद्याप पुरूष घरी परतलेला नाही. याबाबत दापोडी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अमित अशोक काची (वय 38, रा. काटे वृंदावन, पिंपळे गुरव रोड, मोरया हॉस्पिटल पाठीमागे, दापोडी) असे बेपत्ता पुरूषाचे नाव आहे. अमित यांची पत्नी स्वाती काची यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

स्वाती काची कुंटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कॅन्टिंग व्यवसाय करतात, तर त्यांचे पती अमित काची हे आकुर्डी येथे एका कंपनीत काम करतात. सोमवारी रात्री 10.15 वा अमित काची घरी परतले. त्यावेळी ‘माझ्या पायावरून चारचाकी गेली त्यामुळे मी आज कामावर गेलो नाही व मी जुन्या घरी गेलो होतो.’ असे अमित यांनी सांगितले. त्यावरून पती पत्नी मध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर अमित घरातून निघून ते अद्याप घरी परतले नाहीत असे दाखल तक्रारीत म्हटले आहे. दाखल तक्रारीवरून दापोडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बेपत्ता इसमाचे वर्णन खालीलप्रमाणे –

अमित अशोक काची (वय 38, उंची – 5 फुट, नाक – सरळ, अंगाने – मजबुत, रंग – गोरा, तोंडावर वांग आहे, पायात बुट, अंगात गुलाबी रंगाचा टि-शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट आहे)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.