Pimpri News : सोहम सार्वजनिक ग्रंथालय येथे मराठी भाषा दिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरीतील सोहम सार्वजनिक ग्रंथालय  येथे आज (सोमवारी) मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. (Pimpri News) ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मभूषण प्रसिद्ध साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो.

पुणे साहित्य परिषद पिंपरी चिंचवड विभागाचे अध्यक्ष मा.राजन लाखे साहेब प्रमुख पाहुणे यांच्या  हस्ते ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्थानिक नागरिक व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ravet : रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा रिक्षाच्या धडकेत मृत्यू

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी पुढील प्रमाणे विचार प्रकट केले प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात मराठीला प्राधान्य मराठी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.मराठी भाषेला अभिजात दर्जा  मिळवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे.(Pimpri News) मराठी भाषा धोरणाला लवकरात लवकर मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. मराठीसाठी सरकारकडून भरीव निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या गोष्टी मराठी भाषेसाठी उत्साहवर्धक आहेत.

राजन लाखे म्हणाले की, शास्त्रशुद्ध मराठी भाषेचा वापर आपण जास्तीत जास्त केला पाहिजे. इंग्रजी व मराठी या भाषांची सरमिसळ करू नये मराठीलाच सर्व ठिकाणी प्राधान्य दिले गेले पाहिजे. कार्यक्रमाचे सुत्र संचालन ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी केले तर आभार प्रकाश ब्राह्मणकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.