Pune News : औंध चित्रकार 2023 चा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

एमपीसा न्यूज : औंधगाव पुणे येथील एस एम एस ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या गेल्या 5 वर्ष घेण्यात येणा-या औंध चित्रकार स्पर्धा या वर्षी रविवार (Pune News) दिनांक 5 फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्या होत्या. या चित्रकार स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ रविवारी 26 फेब्रुवारी 2023 रोजी औंध येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हे चित्रकलेच्या स्पर्धेचे 5 वे वर्ष होते,  मुलांमध्ये व मुलींमध्ये लपलेल्या सुप्त गुणांचा व कलेचा विकास होणे हा या स्पर्धा घेण्या मागे उद्देश असतो.  तसेच मुला-मुलींना वर्षातून एक दिवस या स्पर्धेतून आनंद मिळावा त्यांच्या चालू परिस्थिती बद्दल त्यांच्या संकल्पना व विचार चित्रकलेच्या माध्यमातून चित्र रूपाने साकारले जावे हा आहे.

हे स्पर्धेचे 5 व वर्ष असून एस एम एस ग्रुप चे अध्यक्ष सोनल सराफ यांच्या संकल्पनेतून हि स्पर्धा घेण्यात आली असून त्या स्व:ता वैयक्तिक लक्ष घालून मुला-मुली साठी आयोजित करतात.(Pune News) या वेळेस या स्पर्धेचे उद्घाटन दत्तात्रय गायकवाड ( माजी महापौर.पुणे). यांच्या हस्ते झाले त्यांनी हया वेळेस चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेल्या 450 मुला-मुलींमध्ये जाऊन संकल्पनेतले चित्र काढण्यास प्रोत्साहान देत आनंद घेतला.

Pimpri News : सोहम सार्वजनिक ग्रंथालय येथे मराठी भाषा दिन साजरा

या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी दिनांक 26 फेब्रुवारी2023 रोजी सकाळी औंध येथे पार पडला.  बाणेरचे विदयांचल हायस्कूल चे संस्थापक अशोक मुरकुटे, औंध येथील A V children dental clinic च्या डॉ.अश्विनी फडणीस ह्यांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण करण्यात आले.

या वेळेस 450 विद्यार्थी व विद्यार्थिनी मधून मुला-मुलींच्या वेगवेगळ्या गटातून 60 जणांना प्रशस्तीपत्रक, खाऊ, छोटी भेटवस्तू व बक्षिस देण्यात आले.(Pune News) त्यामुळे सर्व मुलांना व मुलींना आनंद झाला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते.

यावेळी मुला मुलींना मार्गदर्शन करताना अशोक मुरकुटे ह्यांनी चित्रकलेचे जीवनातील महत्त्व पटवून सांगताना मुलांना ज्या कलेत जास्त रस असेल त्याकडे पालकांनी लक्ष देऊन त्या कलेत पालकांनी विकास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे सांगून मार्गदर्शन केले.

औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद जाधव तसेच गोळवलकर गुरुजी इंग्लिश मिडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका सोनल जाधव ह्यांनी उपस्थित राहून स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य केले. शेवटी हया स्पर्धा पार पाडण्यासाठी पहिल्या पासून सहकार्य करणाऱ्या महाशक्ती (Pune News) वर्ल्ड वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा.विनया सराफ ह्यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले व सर्व आलेल्या पाहुण्यांचे मुला मुलींचे पाल्यांचे उपस्थित राहिल्या बद्दल आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.