Marathi Sahitya Sammelan : ठरलं ! 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्थळ निश्चिती झाली आहे. महामंडळाचे 94 वे मराठी साहित्य संमेलन नाशिक मध्ये होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली आहे. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली.

महामंडळाचे 94 साहित्य संमेलन कुठे होणार याबाबत मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचं एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते, यामध्ये मे महिन्यांत दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती.

संपूर्ण प्रक्रियेनंतर नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्विकारत 94 व्या साहित्य संमेलनासाठी निवड झाली. हे संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत. मागील वर्षीचं 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये पार पडले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.