Crime News : पैशांसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. तिचे स्त्रीधन घेऊन तिला ते परत न देता अपहार करत विवाहितेचा छळ केला. (Crime News) याप्रकरणी पतीसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2018 ते 13 जानेवारी 2023 या कालावधीत काळेवाडी पुणे आणि घाटकोपर मुंबई येथे घडला.

पती हेमंत रामदास कणसे (वय 34, रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई), सासरे रामदास महादेव कणसे (वय 65), सासू, दीर भरत रामदास कणसे (वय 39) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dehu gaon : फिरायला जाण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत याने त्याचे लग्नापूर्वी असलेले प्रेमसंबंध जाणीवपूर्वक फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांपासून लपवून ठेवले. विवाहितेकडे वारंवार 10 लाख रुपयांची मागणी केली. विवाहितेने पैसे देण्यास नकार दिला असता तिला व तिच्या वडिलांना आरोपींनी शिवीगाळ केली. (Crime News) फिर्यादीच्या वडिलांकडून साडेपाच लाख रुपये घेऊन त्यातून फिर्यादीस 13 तोळे सोन्याचे दागिने स्त्रीधन म्हणून केले. त्यापैकी 11.5 तोळे दागिने आरोपींनी परत घेऊन त्या दागिन्यांचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.