Pune News : पुण्याहून मुंबई अवघ्या 25 ते 30 मिनिटांत पोहोचणे शक्य; विमानसेवा होणार सुरू

एमपीसी न्यूज : मुंबई-पुणे नियमित प्रवास करणारे अनेक जण आहेत. त्यांना रेल्वे व रस्ते मार्गाने तीन ते चार तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र आता हा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. पुणे आणि मुंबई प्रवास फक्त 25 मिनिटांत करता येणार आहे. (Pune News) पुणे आणि मुंबई हवाईमार्ग सुरु करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहे. यासाठी एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. मुंबई विमानतळावर स्लॉट मिळणे अवघड असल्याने दिवसातून एकतरी विमान सुरु करावे, यासाठी प्रयत्न सुरु आहे. यासंदर्भात विमानतळ प्राधिकरणाकडेही प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

पुणे-मुंबई हवाई मार्ग सुरु झाल्यास रस्ते वाहतुकीला आणखी एक जलद पर्याय मिळणार आहे. त्यामुळे वेळेत बचत होणार आहे. तसेच प्रवाशांना मुंबई विमानतळावरुनच आंतराराष्ट्री प्रवास करता येणार आहे.  पुणे-मुंबई विमानसेवा 2008 मध्ये सुरु होती. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. त्यानंतर 2017 मध्ये जेट एअरवेजने पुणे-मुंबई विमानसेवा सुरु केली. मात्र ही सेवाही काही कारणांमुळे बंद झाली. त्यानंतर विमानसेवा सुरु करण्याच्या चर्चा झाल्या. परंतु ठोस काहीच भूमिका घेतली गेली नाही.

Dehu gaon : फिरायला जाण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुण्यातील लोहगाव विमानतळावरून देशांतर्गत सेवा वाढली आहे. पुण्यातून परदेशात दुबई, सिंगापूर आणि बँकॉक या ठिकाणी विमानसेवा सुरू आहे. (Pune News) परंतु पुण्यातून इतर देशांसाठी विमानसेवा नाही. पुणे-मुंबई विमानसेवा सुरु झाल्यास इतर देशांमध्ये जाण्यास या प्रवाशांना फायदा होणार आहे. पुणे-मुंबई विमान सेवा सुरू करण्याची मोठी मागणी आहे. त्यानुसार ही सेवा सुरू करण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.