Talegaon News : तरुणाला मारहाण करत लुटल्या प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज  – तळेगाव-चाकण रोडवर तळेगाव येथे मध्यरात्री (Talegaon News) एका तरुणाला बेदम मारहाण करून लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 12) मध्यरात्री घडली. याच चोरट्यांनी एक दुचाकी चोरून त्यांनतर कंटेनर चालकांना देखील लुटले.

हेमंत बाळू धोत्रे (वय 20, रा. तळेगाव दाभाडे), सुमित राकेश गलीयल (वय 20, रा. तळेगाव दाभाडे), अनिकेत दादाभाऊ धायभर (वय 22, रा. तळेगाव दाभाडे) या तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रवींद्र चंद्रभान यादव (वय 29, रा. कातवी, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Crime News : पैशांसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चौघांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास तळेगाव-चाकण रोडने जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवून हाताने बेदम मारहाण केली.(Talegaon News) त्यानंतर फिर्यादी कडील आठ हजारांचा मोबाईल फोन आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेला.

याच आरोपींनी सुरुवातीला तळेगाव स्टेशन चौकातून एका तरुणास मारहाण करून त्याची दुचाकी चोरली. त्यानंतर तळेगाव-चाकण रोडवर दोन कंटेनर अडवून चालकांना लुटले. याबाबत देखील गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.