Marunji : उघड्या दरवाजा वाटे दोन लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – खोलीच्या उघड्या दरवाजावाटे (Marunji) आतमध्ये प्रवेश करत खोलीतून दोन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत शुभश्री पीजी, शिंदे वस्ती, मारुंजी येथे घडली.
सुयश यशवंत लाड (वय 22, रा. शुभश्री पीजी, शिंदे वस्ती, मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा अमित्र नागेंद्र हे शुभश्री पीजी मध्ये एका खोलीत राहतात. ते 11 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कामानिमित्त बाहेर गेले.
Kalewadi : भरधाव दुचाकीची पादचारी व्यक्तीस धडक; पादचाऱ्याचा मृत्यू
त्यावेळी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. अज्ञात चोरट्याने (Marunji) उघड्या दरवाजा वाटे खोलीत प्रवेश करून फिर्यादी आणि त्यांच्या मित्राचा असे एकूण 30 हजार रुपयांचे दोन लॅपटॉप चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.