BNR-HDR-TOP-Mobile

Maval : मतदारसंघात 83 मतदान केंद्रे संवेदनशील; पिंपरीत 22 तर मावळ, कर्जतमध्ये 16

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात 83 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 22 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. तर, चिंचवड विधानसभा मतदारसंघात 9 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. या सर्व केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’ कॅमे-यांचा वॉच राहणार आहे. सुरक्षा व्यवस्थाही या केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (सोमवारी) मतदान होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदारसंख्या वाढल्याने मावळ लोकसभा मतदारसंघात 104 मतदान केंद्रांची भर पडली आहे. मूळ 2400 केंद्र असून या निवडणुकीसाठी 2504 मतदान केंद्र राहणार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील 208 मतदान केंद्रांचे ‘वेबकास्टिंग’ होणार आहे. त्यासाठी 250 ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यात संवेदनशील मतदान केंद्रांचांही समावेश आहे. अशा मतदान केंद्रांवर जास्तीची सुरक्षा व्यवस्थाही करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

मावळातील विधानसभा मतदारसंघनिहाय संवेदनशील मतदान केंद्र
पनवेल – 10
कर्जत – 16
उरण – 10
मावळ – 16
चिंचवड – 9
पिंपरी – 22
एकूण – 83

संवेदनशील मतदान केंद्र निश्चितीचे निकष

निवडणूक ओळखपत्र मतदारांकडे अल्प प्रमाणात आहेत अशी मतदान केंद्र.
पूर्वीच्या मतदानाची टक्केवारी 75 टक्क्यांपेक्षा जास्त व 75 टक्क्यांपेक्षा जास्त मते एकाच उमेदवाराला प्राप्त झालेली मतदान केंद्र.
गेल्या निवडणुकीमध्ये गैरप्रकार व मतदान विषयक हिंसेमुळे फेरमतदान झालेले मतदान केंद्र.
पूर्वीच्या निवडणुकीमध्ये गैरप्रकार निदर्शनास आलेले मतदान केंद्र.
उपरोक्त निकषाच्या आधारावर निवडणूक अधिकारी व पोलीस अधिकारी हे संयुक्तपणे संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्र ठरवितात.

HB_POST_END_FTR-A2

.