Maval : टाकवे बुद्रुक येथील गरजूंना उद्योजक अनिल असवले यांचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने  ग्रामीण भागातील नागरिकांचे  जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मजूर, कामगार तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे या काळात अत्यंत हाल होत आहेत.या परिस्थितीचे  गांभीर्य लक्षात घेत, टाकवे बुद्रुक येथील उद्योजक अनिल मच्छिंद्र असवले यांनी टाकवे येथील पाचशे गरजूंना तांदूळ, खाद्यतेल, बिस्कीटचे वाटप केले. 
कोणीही भुकेला राहू नये, अशा अडचणीच्या काळात मदतीचा हात देणे हे क्रमप्राप्त असून यातून गोरगरीबांची सेवा करण्याची संधी मिळाली असून समाजातील सर्वच दानशूर व्यक्तीनी पुढे येऊन गरजूंना मदत करावी, असे आवाहन उद्योजक अनिल म. असवले यांनी केले. यावेळी गणपत असवले, सुनील असवले, संदीप तु. असवले, समिर गणपत असवले आदीजण उपस्थितीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.