Maval : टाकवे बुद्रुक पुलावरून कार इंद्रायणी नदीत कोसळली, एनडीआरएफच्या जवानांना कार शोधण्यात यश; अद्याप एक युवक बेपत्ता

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक पुलाचा कठडा तोडून कार इंद्रायणी नदीच्या पाण्यात कोसळली. ही घटना आज दुपारी सव्वाएकच्या सुमारास घडली. एनडीआरएफच्या जवानांना कार शोधण्यात यश आले आहे. तसेच एनडीआरएफच्या जवानांना संकेत आसवले याचा मृतदेह आढळला असून अद्याप एका युवकाचा शोध घेत आहेत.

घटनास्थळी बचावकार्यासाठी एनडीआरएफची एक टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. तसेच पुलावर नागरिकांनी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवदुर्ग संस्थेच्या कार्यकर्त्यांचे शोधकार्य चालू आहे. 

  • याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, टाकवे जवळील इंद्रायणी पुलावरून स्विफ्ट डिझायर कार पुलाचा कठडा तोडून इंद्रायणी नदीच्या पाण्यात पडली. या कारमध्ये अक्षय संजय ढगे (वय २० वर्षे), संकेत नंदु असवले (ड्रायव्हर) (वय २० वर्षे) आणि अक्षय मनोहर जगताप (वय २० वर्षे, तिघेही राहणार रा. टाकवे बु., ता. मावळ जि. पुणे) हे होते. एनडीआरएफच्या जवानांना कार शोधण्यात यश आले आहे. संकेत आसवले याचा मृतदेह आढळला असून अद्याप एका युवकाचा शोध घेत आहेत.

त्यातील अक्षय ढगे हा पोहून बाहेर आला. तर, इतर दोघेजण कारमध्ये अडकले होते.  संकेत आसवले याचा मृतदेह आढळला असून अद्याप एका युवकाचा शोध घेत आहेत. स्थानिक आणि शिवदुर्ग टीमचे काम चालू आहे. एनडीआरएफची टीम हजर असून शोधकार्य चालू आहे. मावळचे तहसीलदार आणि कामशेतचे पोलीस निरीक्षक, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक पोलीस बंदोबस्तासह हजर आहेत.

सुरुवातीला लोकांची गर्दी झाली होती. तसेच दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबविण्यात आली होती. मात्र, आता गर्दी कमी झाली असून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत सुरु आहे. अद्याप शोधकार्य चालू असून आयएनएस शिवाजी येथील पाणबुड्यांना पाचारण केले आहे. खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवलेला असून परिस्थिती नियंत्रणात आहे, असे वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.