Maval News : गाडीला कट मारल्यावरून दोन गटात हाणामारी

परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – गाडीला कट मारल्याचा जाब विचारल्यावरून (Maval News )दोन गटात हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि. 27) सकाळी दहा वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

याबाबत 40 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अमर खोले, त्यांचा जावई आणि दहा ते बारा अनोळखी व्यक्तींच्या विरोधात मारहाण, दमदाटी आणि अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या गाडीला आरोपींनी कट मारल्याचा जाब त्यांच्या मुलाने विचारला. त्यावरून आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि दीर यांना कोयत्याने मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

IPL 2023 – रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पुन्हा यश मिळेल?

 

 

याच्या परस्पर विरोधात सागर बाळू नाणेकर (वय 30, रा. डोंगरगाव, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात मारहाण आणि दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादींना रॉडने डोक्यात व पाठीवर मारहाण केली. फायटरने डोक्यात व गालावर मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस (Maval News ) तपास करीत आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.