Maval Corona News : नवीन 175 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात सोमवारी (दि.17) 175 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला,तर तालुक्यात दिवसभरात 36जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1037आहे.

शहरी भागात 132 रूग्ण तर ग्रामीण भागात 43 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 103 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 24 रूग्ण आज सापडले आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 05 रूग्ण आज सापडले. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 29,404 झाली आहे. तर दिवसभरात 36 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात गहुंजे येथे 06 रूग्ण सापडले. नवलाख उंब्रे व कुरवंडे येथे प्रत्येकी 04 रुग्ण सापडले. टाकवे बुद्रुक येथे 06 रुग्ण सापडले. कुसगाव व कामशेत येथे प्रत्येकी 03 रूग्ण सापडले. वराळे, परंदवडी,कडधे,सोमाटणे व तळेगाव दाभाडे (ग्रामीण ) येथे प्रत्येकी 02 रुग्ण सापडले.तर करंजगाव,वडेश्वर,कूणे नामा, शिरगाव, कशाळ, आंबी, वाकसई, बौर,कान्हे,आढले खुर्द,आढले बुद्रुक, शिळिंब व धामणे येथे प्रत्येकी 01रूग्ण सापडला. असे एकूण 43 रुग्ण सापडले.

27,842 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 9,509 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,884 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,451 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 15,844 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,560 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.69 टक्के आहे तर मृत्यू दर 1.79 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 417, लोणावळा नगरपरिषदमध्ये 192 वडगाव नगरपंचायतमध्ये 40 व ग्रामीण भागात 388 असे एकूण 1037 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.