Maval Corona Update : दिवसभरात 122 रुग्णांची भर तर 183 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सोमवारी (दि.5) 122 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 183 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसून आतापर्यंत 238 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सक्रिय रुग्णांची संख्या 728 आहे. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 60 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 31 रुग्ण व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 09 रुग्ण सापडले.

सध्या रुग्णालयात 728 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10234 झाली आहे. तर दिवसभरात 173 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 100 रुग्ण तर ग्रामीण भागात 22 रुग्ण सापडले.

ग्रामीण भागात भाजे 05, सोमाटणे 05, वाकसई 03, बेबड ओहोळ 02, कामशेत, कुणे नामा, साळुंब्रे, नायगाव, साते, शिलाटणे, उर्से प्रत्येकी 01 एकूण 22 रुग्ण सापडले.

9268 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 238 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3374, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1918 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 652 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 5944 रुग्ण तर ग्रामीण भागात 4290 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 90.56 टक्के आहे तर मृत्यू दर 2.33 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 310, लोणावळा नगरपरिषद मध्ये 147, वडगाव नगरपंचायतमध्ये 39 व ग्रामीण भागात 233 असे एकूण 728 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.