Maval Corona Update : दिवसभरात 20 नवे रुग्ण; सक्रिय रुग्णांची संख्या 128

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात बुधवार (दि.3) 20 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात एकही जणाला डिस्चार्ज देण्यात आला नाही. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 128 आहे.

वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 05 रुग्ण सापडले तर तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत 10 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 128 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8357 झाली आहे. तर दिवसभरात एकालाही डिस्चार्ज देण्यात आला नाही. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 15 रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात कुरवंडे 04 रुग्ण तर तळेगाव दाभाडे ग्रामीण 01 रुग्ण सापडला.

ग्रामीण भागात 05 रुग्ण सापडले तर शहरी भागात 15 रुग्ण सापडले. सध्या 128 रुग्ण सक्रिय आहेत. 7987 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2567, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1651 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 551 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4769 रुग्ण तर ग्रामीण भागात 3588 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.