Maval Corona Update : मावळमध्ये आज 57 नवे रुग्ण; 39 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात बुधवारी (दि.28) 57  रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 39  जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत तालुक्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 475 आहे.

आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. मागील महिन्याभरात 14 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद झाली असून आतापर्यंत 512 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज तालुक्यातील शहरी भागात 31 तर ग्रामीण भागात 26 रुग्ण सापडले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 18  रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 9 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 4  रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 25,778 झाली आहे. तर दिवसभरात 39 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वराळे 4, कार्ला 3, सुदवडी, सुदुंबरे, तिकोणा प्रत्येकी 2, वाकसाई, कुणे नामा, कोंडीवडे नामा, कुसगाव खुर्द, कुसगाव बुद्रुक, पवळेवाडी, जवन, इंदोरी, येलघोल, प्रभाचीवाडी, कान्हे, सोमवडी व शिलाटणे प्रत्येकी 1 असे एकूण 26 रुग्ण सापडले.

आतापर्यंत 24,788 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 515  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,158 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,313 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,291 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 13,763 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,015 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.16 टक्के आहे तर मृत्यू दर 2 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये 130 लोणावळा नगरपरिषदमध्ये 72 वडगाव नगरपंचायतमध्ये 11 व ग्रामीण भागात 262 असे एकूण 475 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.