Maval Corona Update : मावळात 71 नवे रुग्ण; 46 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.22) 71 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 46 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 490 इतकी आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 685 आहे. आज शहरी भागात 25 तर ग्रामीण भागात 46 रुग्ण आज सापडले.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 11 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 13 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 01 रुग्ण सापडला. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 23,414 झाली आहे. तर दिवसभरात 46 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात काले 09, टाकवे बुद्रुक 07, कुसगाव बुद्रुक 05, परंदवडी 05, चांदखेड, कामशेत, ब्राम्हणोली, शिलाटणे व तळेगाव दाभाडे ग्रामीण प्रत्येकी 02, पारवडी, धामणे, कोथुर्णे, नाणे, दहिवली, टाकवे खुर्द, मोहितेवाडी, येळसे, आंबी व पाले नामा प्रत्येकी 01 असे एकूण 46 रुग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 22,238 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 490 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,499 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3,957 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,199 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 12,655 रुग्ण तर ग्रामीण भागात 10,759 रुग्ण आढळून आले आहेत. 3 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.98 टक्के आहे तर मृत्यू दर 2.09 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये 201, लोणावळा नगरपरिषदमध्ये 67, वडगाव नगरपंचायतमध्ये 33 व ग्रामीण भागात 384 असे एकूण 685 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.