Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज 79 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 76 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (शुक्रवारी, दि. 18) कोरोनाचे 76 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 3 हजार 493 झाली आहे. तर दिवसभरात 79 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कार्ला (पुरुष, 63 वर्ष), साळुंम्बरे (महिला, 78 वर्ष) येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 42 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 34 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 31, लोणावळा शहरात 9, वडगावात 2 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 3 हजार 493 रुग्णांमध्ये सध्या 858 रुग्ण सक्रीय आहेत. तर 2 हजार 524 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 87, लोणावळा नगरपरिषद 700 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 226 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 480 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.