Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 79 नवे रुग्ण तर 138 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सोमवारी (दि.12) 79 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 138 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 499 इतकी आहे. रुग्ण संख्येत घट होत असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 666 आहे. शहरी भागात 48 तर ग्रामीण भागात 31 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 32 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 14 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 2 रुग्ण सापडला.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 24,908 झाली आहे. तर दिवसभरात 138 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वाकसाई 4, बेलज 3, वराळे 3, कान्हे 2, शिवणे 2, निगडे, माळवाडी, जवन, राजपुरी, भोयरे, औंढोली, चिखलसे, सोमाटणे, मळवंडी ठुले, टाकवे बुद्रुक, साळुंब्रे, येळसे, ब्राम्हणोली, नवलाख उंब्रे, मळवली नामा, नायगाव व कामशेत प्रत्येकी 1 असे एकूण 31 रुग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 23,743 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 499 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,906 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,167 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,258 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 13,331 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,577 रुग्ण आढळून आले आहेत. 2 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.33 टक्के आहे तर मृत्यू दर 2 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 202 लोणावळा नगरपरिषदमध्ये 102 वडगाव नगरपंचायतमध्ये 13 व ग्रामीण भागात 349 असे एकूण 666 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.