Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 83 नवीन रुग्ण; 103 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (सोमवारी, दि. 14) कोरोनाचे 83 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 3 हजार 119 झाली आहे. तर दिवसभरात 103 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आनंदनगर इंदोरी (पुरुष, 65 वर्ष) येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 54 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 29 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत 11, सोमाटणे 5, उर्से 3, कुसगाव बु. 2, कडधे, कान्हे, कातवी, भाजे, सुदवडी, कांब्रे ना मा, काले, पाटण येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 12, लोणावळा शहरात 37 आणि वडगावमध्ये 5 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 3 हजार 119 रुग्णांमध्ये सध्या 895 रुग्ण सक्रीय आहेत. तर 2 हजार 117 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 107 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 979, लोणावळा नगरपरिषद 607 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 213 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 320 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.