Maval Corona Update : आज तालुक्यात 96 नवे रुग्ण तर 392 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात गुरुवारी (दि.27) 96 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 392 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 432 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1910 आहे.

शहरी भागात 55 तर ग्रामीण भागात 41 रुग्ण आज सापडले.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 34 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 16 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 05 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 21713 झाली आहे. तर दिवसभरात 392 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

गुरूवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात खांड 12, वराळे व कान्हे येथे प्रत्येकी 06, काले व नवलाख उंब्रे प्रत्येकी 03, इंदोरी व निगडे प्रत्येकी 02, शेवती, जवन, नायगाव, शिरगांव, चांदखेड, आंबळे व बुधवडी प्रत्येकी 01 असे एकूण 56 रुग्ण सापडले.

19372 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7079, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3779 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1120 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 11,978 रुग्ण तर ग्रामीण भागात 9735 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 89.22 टक्के आहे तर मृत्यू दर 1.99टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 798 लोणावळा नगरपरिषदमध्ये 166 वडगाव नगरपंचायतमध्ये 71 व ग्रामीण भागात 875 असे एकूण 1910 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.